प्रत्येक अनुभव काही ना काही शिकवतो.
प्रत्येक अनुभव महत्वपूर्ण आहे.
कारण आपण स्वतःच्या चुकांमधूनच
शिकत असतो..- गौतम बुद्ध
मन सर्वकाही आहे,
तुम्ही जे विचार करता
ते तुम्ही बनता..-गौतम बुद्ध
खऱ्या अर्थाने स्वतःवर प्रेम करणारी व्यक्ती
कधीच कोणालाही दुखवू शकत नाही..
– गौतम बुद्ध
तुमच्या रागामुळे तुम्हाला शिक्षा होणार नाही,
तुमच्या रागाने तुम्हाला शिक्षा होईल.
स्वतःच्या क्षमतेवर कोणतेही कार्य करा,
दुसऱ्यावर अवलंबून राहू नका…
आपल्या विचारांवर आपण
अवघे जग निर्माण करू शकतो…
संयम हा खूप कडवट असतो,
पण त्याच फळ खूप गोड असतं.
भूतकाळावर लक्ष न देता
भविष्याविषयी विचार करा.
आणि स्वतःच्या मनाला वर्तमानात..
शांतता नेहमी मनातूनच येत असते,
त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेलात
तर ती मिळणार नाही…
जगात तीन गोष्टी कधीही लपवल्या जात नाहीत,
सूर्य, चंद्र आणि सत्य…
“आपल्या वयावर आणि पैश्यांवर
कधीच घमंड करू नका,
कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात,
त्या एक ना एक दिवस संपतातच.”
“तुम्ही तीच गोष्ट गमावता,
ज्या गोष्टीला जास्त बिलगता
किंवा चिटकून राहता.”
“सुख मिळवायचा असा कोणताच रस्ता नाही आहे,
त्यापेक्षा खुश राहणे हाच एक रस्ता आहे.”
“तुमचा शत्रू जितकी इजा करत नाही,
त्यापेक्षा जास्त इजा नकारात्मक विचार करतात..”
“राग कवटाळून धरणे म्हणजे
स्वतः विष पिऊन समोरच्या व्यक्तीच्या
मरणाची वाट पाहण्यासमान असते.”
धम्म सकाळ
नशिबात आहे तसे घडेल
या “भ्रमात” राहू नका.
कारण आपण जे “करू” त्याचप्रमाणे
“नशीब ” घडेल यावर विश्वास ठेवा.
आनंदाचा कोणता मार्ग नसतो.
आनंदी राहणे हाच मार्ग आहे.
गौतम बुद्ध..
तुमच्याकडे जे आहे ते
वाढवून चढवून सांगू नका,
इतरांचा द्वेष करू नका, कारण
इतरांचा द्वेष मत्सर करणाऱ्या व्यक्तीला
कधीच शांती मिळत नाही.
बोलण्याआधी – ऐका
खर्च करण्याआधी – कमवा
लिहिण्याआधी – विचार करा
सोडण्याआधी – प्रयत्न करा
मरण्याआधी – जगा
जगातील दु:ख नाहीसे करण्यासाठी
भगवान गौतम बुध्दांनी स्वत:चे घरदार सोडून
ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला.
एक छोटी मेणबत्ती हजारो मेणबत्त्यांना
प्रकाश देऊ शकते तसेच
बुद्ध धम्माचा एक विचार
तुमचं आयुष्य उज्वल करु शकतो..
बुद्ध विचार आहे , दुराचार नाही
बुद्ध शांती आहे , हिंसा नाही
बुद्ध प्रबुद्ध आहे , युद्ध नाही
बुद्ध शुद्ध आहे , थोतांड नाही
🍁जीवनात जर हजारो लढाया जिंकण्यापेक्षा
स्वतःवर विजय प्राप्त करा
मग विजय नेहमी तुमचाच होईल.
मग हा विजय तुमच्या कडून कोणीही
हिरावून घेऊ शकत नाही.
कोणतीही गोष्ट देण्यामध्ये
काय सामर्थ्य आहे
हे तुम्हाला जर कळत असेल
तर तुम्ही कोणत्याही दिवशीचे जेवण
हे एखाद्या बरोबर वाटून
घेतल्याशिवाय राहू शकत नाही..
जीभ हि एखाद्या धारदार
सुरी प्रमाणे असते
पण त्यातून आलेले शब्द हे
घायाळ करतात..!!
इतकाच फरक आहे,
फक्त रक्ताचा सडा घालत नाहीत.
जो माणूस मनात उफाळलेल्या क्रोधाला
वेगवान रथाला रोवल्या प्रमाणे आवर घालतो
त्यालाच मी खरा सारथी समजतो.
क्रोध भ्रष्ट होऊन त्याप्रमाणे चालणारा केवळ
लगाम हातात ठेवणारा समजला जातो.
शांतता ही नेहमी
मनातून येत असते..!
त्याचा कुठेही बाहेर शोध
घ्यायला गेलात तर
ती मिळणार नाही..!
आदर हा आरशाप्रमाणे असतो
जितका तुम्ही अधिक दाखवाल
तितका तुम्हाला तो अधिक परत मिळेल..